breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus | राज्यातील संक्रमितांची संख्या 8590 वर

मुंबई | राज्यात सोमवारी कोरोना संक्रमणाचे 522 नवीन रुग्ण आढळले, तर 27 जणांचा मृत्यू झाला. यासोबतच राज्यातील संक्रमितांची संख्या आता 8590 झाली असून, मृतांचा आकडा 369 झाला आहे. मागील 24 तासात सर्वात जास्त 395 रुग्ण मुंबईत सापडले, तर 15 जणांचा मृत्यू झाला. एकट्या मुंबईमध्ये कोरोनाचे एकूण 5589 रुग्ण आहेत. तर, 219 मृत्यू झाले आहेत.कोरोनाच्या प्रादुर्भावाला कमी करण्यासाठी बीएमसीकडून महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जेजे हॉस्पिटलमध्ये प्रतिदीन 2200 टेस्ट करण्याची तयारी सुरू झाली आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात चाचण्या करणारे हे देशातील पहिलेच सेंटर असेल. यासाठी हॉस्पीटलला एक मशीन मिळाली आहे, जी दररोज दोन हजार चाचण्या करू शकते. सध्या हॉस्पीटलच्या लॅबमध्ये दिवसाला 200 चाचण्या होत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button