breaking-newsमनोरंजन

सुशांतच्या कुटुंबियांनी चाहत्यांसाठी ‘सुशांतसिंह राजपूत फाउंडेशन’ची निर्मिती

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या लाखो चाहत्यांनी सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केलं . सुशांतचे मित्र, बॉलिवूडमधील सहकारी, चाहते अजूनही या धक्क्यातून सावरु शकलेले नाहीत. दरम्यान, सुशांतच्या कुटुंबियांनी लाखो चाहत्यांचं प्रेम पाहून एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी सुशांतच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत या निर्णयाची घोषणा केली आहे .

“सुशांतच्या आठवणी आणि सन्मानासाठी आम्ही ‘सुशांतसिंह राजपूत फाउंडेशन’ची निर्मिती करत आहोत. या फाउंडेशनद्वारे सुशांतच्या आवडत्या क्षेत्रात म्हणजेच विज्ञान, चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रात काम करु इच्छिणाऱ्या तरुणांना पाठबळ दिलं जाईल. तसेच पाटण्यातील राजीव नगर येथील त्याच्या घराचं रुपांतर स्मारकात करत आहोत. तिथे आम्ही त्याच्या वैयक्तिक वस्तू ठेवू. यामध्ये त्याचे पुस्तकं, टेलिस्कोप, फ्लाईट सिम्युलेटरसह अनेक गोष्टी ठेवू, जेणेकरुन त्याचे चाहते त्याच्यासोबत सदैव जोडले राहतील”, अशी घोषणा कुटुंबियांनी केली आहे.

तो जगासाठी सुशांतसिंह राजपूत होता. मात्र, आमच्यासाठी तो गुलशन होता. आम्ही त्याला प्रेमाने गुलशन म्हणायचो. तो स्वतंत्र विचारसरणीचा, समजुतदार आणि खूप प्रेमळ मुलगा होता. त्याला शिकण्याची खूप गोडी होती. त्यामुळे त्याला प्रत्येक क्षेत्राविषयी माहिती जाणून घ्यायला आवडायचं. त्याने खूप मोठी स्वप्न बघितली. प्रचंड मेहनत घेत ती स्वप्न साकारण्यासाठी मार्गक्रमण केलं.

गुलशनच्या आठवणी आणि सन्मानासाठी आम्ही सुशांतसिंह राजपूत फाउंडेशनची निर्मिती करत आहोत. या फाउंडेशनद्वारे सुशांतच्या आवडत्या क्षेत्रात म्हणजेच विज्ञान, चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रात काम करु इच्छिणाऱ्या तरुणांना पाठबळ दिलं जाईल. तसेच पाटण्यातील राजीव नगर येथील त्याच्या घराचं रुपांतर स्मारकात करत आहोत. तिथे आम्ही त्याच्या वैयक्तिक वस्तू ठेवू. यामध्ये त्याचे पुस्तकं, टेलिस्कोप, फ्लाईट सिम्युलेटरसह अनेक गोष्टी ठेवू, जेणेकरुन त्याचे चाहते त्याच्यासोबत सदैव जोडले राहतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button