breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus | रत्नागिरीत दुबईतून परतलेल्या व्यक्तीचा मृत्यू

रत्नागिरी |खेड येथील कोरोनाबाधीत रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील करोनाचा हा पहिला बळी आहे. संबंधित व्यक्ती दुबई येथून खेड येथे आली होती. खेड रुग्णालयात या रुग्णाला दाखल करण्यात आले होते. तिथेच आज त्याचा मृत्यू झाला.

खेडमधील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात ६ एप्रिल रोजी या रुग्णाला दाखल करण्यात आले होते. या रुग्णाचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या रुग्णाची प्रकृती खालावत गेली आणि आज मृत्यू झाला. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाचा हा पहिला बळी असून या वृत्ताने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आरोग्य आणि पोलीस यंत्रणा आता अधिक सतर्क झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button