breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

#CoronaVirus: रणजितसिंह मोहिते-पाटील पुन्हा Home Quarantine

भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आज पुन्हा दुसऱ्यांदा अकलूजमध्ये गृह विलगीकरणात राहणे पसंत केले आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांचे स्वीय सहायक व अन्य कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झालेली आहे. आमदार रणजितसिंह मोहिते हे गेल्या १० जून रोजी मुंबईत धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोनच दिवसांनी मुंडे हे करोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या संपर्कात आल्यामुळे आमदार रणजितसिंह मोहिते यांनी आजपासून अकलूजमध्ये गृह विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतलेला आहे.

यापूर्वीही, मुंबईत विधान भवनात विधान परिषदेच्या सदस्यपदाची शपथ घेऊन अकलूजला परतल्यानंतर त्यांनी स्वतःला १४ दिवस घरात विलगीकरणात राहणे पसंत केले होते.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाली असून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कोणतीही लक्षणं नाहीत असंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करत आहोत असं यावेळी त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये ३४९३ करोना बाधित आढळले आहेत. तसेच १२७ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १ लाख १ हजार १४१ इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४७.३ टक्के इतके आहे. तर राज्यातील मृत्यूदर ३.७ टक्के इतका आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये १७१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ४७ हजार ७९६ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्याच्या घडीला राज्यात ४६ हजार ६१६ रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button