breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus : मुंबई लोकल फिनाईलने स्वच्छ करणार

मुंबई | राज्यासह देशात कोरोना व्हायरसच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. गर्दीच्या ठिकाणी कोरोना पसरण्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी खबरदारी घेण्याची सूचना आरोग्य विभागाकडून आणि सरकारकडून करण्यात येत आहे. सॅनिटायझरचा वापर करा, हात साबणाने किमान २० सेकंद धुतले पाहिजे.

नाकाला, तोंड, कान, डोळे यांना सारखा हात लावू नका. शिंकताना किंवा खोकताना रुमाल अथवा टीश्यू पेपर घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. मुंबईत जास्त करुन रेल्वेला गर्दी दिसून येत आहे. लोकलमध्ये दररोज लाखो प्रवासी प्रवास करत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका लक्षात घेता लोकल आता फिनाईलने स्वच्छ करण्यात येणार आहे. कोरोनाची जगात दहशत दिसून येत आहे. जगात लाखो लोक या साथीच्या आजाराने त्रस्त आहेत. तर ४००० पेक्षा जास्त लोकांचा आतार्पंयत मृत्यू झाला आहे. देशातही ८०च्या घरात बाधा झालेल्यांची संख्या गेली असून दोघांचा मृत्यू झाला आहे.

तर महाराष्ट्रातही १९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय घेण्याचे आवाहन आरोग्या विभाग आणि राज्य सरकारने केले आहे. मुंबई रेल्वे आणि उपनगरीय लोकलने दररोज ७५ लाखांहून अधिक लोक रेल्वेने प्रवास करत आहेत. कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने रेल्वे फिनाईलने साफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button