breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने अकरावीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या

नांदेड – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ऑनलाईन पद्धतीचं शिक्षण सुरू आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांकड़े मोबाईल, लॅपटॉप अशी साधनं नसल्याने त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील मजुराच्या १७ वर्षीय मुलीने ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल घेण्याकरता पैसे नसल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही अकरावीत शिकत होती. घरच्यांकडे मोबाईल मागूनही न दिल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले.

नायगाव शहरातील फुलेनगर वसाहतीत राहणाऱ्या व अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या बुद्धशीला पोटफोडे हिने हे टोकाचे पाऊल उचललं आहे. दहाव्या वर्गातून उत्तीर्ण झालेल्या बुद्धशिलाने ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याकारणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केलीय. ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल न घेऊन दिल्याने शिक्षण थांबेल, या नैराश्यातून या विद्यार्थिनीने हे टोकाचे पाऊल उचललं आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित घटना नायगाव शहरातील फुलेनगर येथील असून आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचं नाव बुद्धशीला प्रकाश पोटफोडे आहे. बुद्धशीला सध्या अकरावीला शिकत होती. तिला दहावीला 75 टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेतही चांगले गुण मिळवण्यासाठी तिला अभ्यासात मागं पडायचं नव्हतं. त्यामुळे तिनं आपल्या आई-वडिलांकडे मोबाईलची मागणी केली होती. घरच्यांनीही लवकरत मोबाईल घेऊन देण्याचं आश्वासन दिलं होतं. तोपर्यंत मुलीनं गळफास लावून आत्महत्या केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button