breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

… अन्ं पुणे-लोणावळा लोकल रेल्वे आतंकवाद्यांकडून हायजॅक

रेल्वे पोलिसांचे चिंचवड स्टेशनवर ‘माॅक ड्रील’ प्रवाशांनी अनुभवला

पिंपरी ( महा ई न्यूज ) – चिंचवड रेल्वे स्टेशनवर असलेल्या प्रवाशांच्या गर्दींचा फायदा घेत आतंकवादी पुणे-लोणावळा लोकल रेल्वे हायजॅक केली. अचानक झालेल्या गोंधळाने रेल्वे प्रवाशांचा जीव भांड्यात पडला होता. मात्र, रेल्वे पोलिसांनी जीवाची पर्वा न करता सुरक्षा यंत्रणा तातडीने हलवित अवघ्या पंधरा मिनिटात आतंकवाद्याना कंठस्थान घातले. हा थरार आज ( मंगळवारी) चिंचवड रेल्वे स्थानकावर दुपारी दीडच्या सुमारास माॅकड्रीलचा अनुभवता आला. 

रेल्वे पोलिसांना कॉल आला की, काही आतंकवादी चिंचवड रेल्वे स्थानकावरील लोकलमध्ये घुसले असून त्यांनी रेल्वे त्यांच्या ताब्यात घेतली आहे. मग काय, अवघ्या काही मिनीटात 15 ते 20 जवानांनी हातात रायफल घेत संपूर्ण लोकलला वेढा दिला. श्‍वानपथक, बॉम्ब शोधक पथक, अग्निशामक दल, रुग्णवाहीका अशा सर्व यंत्रणा घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्या. अचानक रेल्वे पोलिसांनी फायरिंग सुरु केले. यामध्ये रेल्वे पोलिसांनी दोन आतंकवाद्यांना कंठस्नान घातले, तर एकाला त्यांनी जीवंत पकडले.

दरम्यान, अचानक झालेल्या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशी गोंधळात पडले होते. नेमकं काय चाललंय काही कळेना कोणाला. काही महिला प्रवाशांसह अनेकजण चांगले घाबरले होते. रेल्वे पोलिसांनी कर्तव्य तत्परता दाखवित आतंकवाद्याचे मनसुबे उधळून लावले. अवघ्या दहा-पंधरा मिनिटात झालेल्या प्रकारामुळे बघ्याची चांगलीच गंर्दी झाली होती. परंतू,  हे रेल्वे पोलिसांचे मॉकड्रील असल्याचे सांगताच साऱ्यांनी सुटकेचा निश्‍वास टाकला. यावेळी उपस्थित जवांनानी मॉकड्रीलचे कारण सांगत नागरिकांनाही अशावेळी कोणती काळजी घ्यावी, जवानांना कसे सहकार्य करावे. याविषयी माहिती दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button