breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: महाराष्ट्रात कोरोनाचे नवे ५२२ रुग्ण, २७ मृत्यू, संख्या ८५०० च्या पुढे
महाराष्ट्रात करोनाचे ५२२ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या आता ८५९० एवढी झाली आहे. आज करोनामुळे २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची लागण होऊ मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ३६९ झाली आहे. २४ तासात ९४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे.