breaking-newsराष्ट्रिय

#Coronolockdown:पुरीमध्ये यंदा रथनिर्मिती नाही; 3 मेनंतर यात्रेबाबत निर्णय


काेराेनाचा परिणाम जगन्नाथ रथयात्रेवरही झाला आहे. अक्षय्य तृतीयेपासून रथनिर्मितीचे काम सुरू हाेते. परंतु यंदा लाॅकडाऊनमुळे ते हाेणार नाही. ३ मेपर्यंत हे काम थांबवण्यात आले आहे. शुक्रवारी मंदिर व्यवस्थापनाच्या बैठकीनंतर पुरी गजपती महाराज यांनी ‘भास्कर’ला ही माहिती दिली. ते म्हणाले, ३ मेनंतर केंद्राच्या दिशानिर्देश, नियम व परंपरांचा विचार करून रथयात्रा उत्सव हाेणार किंवा नाही याबाबतचा अंतिम निर्णय हाेईल.


भगवान जगन्नाथ यांची चंदन जात्रा, अक्षय्य तृतीया उत्सव मंदिर परिसरात साजरा केला जाणार आहे. हे अनुष्ठान निवडक पुजारी-सेवक करतील. परंतु त्यासाठी भाविकांना परवानगी दिली जाणार नाही. अक्षय्य तृतीया मंदिराच्या बाहेर रथ कलामध्ये साजरी केली जाईल. चंदन जात्रा एका सराेवरात आयाेजित केली जाते. १७३६ पासून या रथयात्रेचे आयाेजन केले जाते. यंदा आयाेजन झाले नाही तर २८४ वर्षांची परंपरा खंडित हाेईल. रथयात्रेसाठी दरवर्षी नवीन रथ तयार केला जाताे. अक्षय्य तृतीयेच्या दिवसापासून तीन रथांच्या निर्मितीचे कम सुरू हाेते अशी परंपरा आहे. यंदा रथयात्रा २३ जूनला आहे. दुसरीकडे आेडिशाचे मुख्यमंत्री पटनायक यांनीही पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याशी रथयात्रेबद्दल चर्चा केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button