breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: मर्कझ प्रकरणी आणखी २९४ विदेशी नागरिकांविरुद्ध आरोपपत्र

व्हिसाच्या अटींचे उल्लंघन करून दिल्लीच्या निझामुद्दीन मर्कझ येथील धार्मिक मेळाव्यात सहभागी झाल्याबद्दल, बेकायदेशीरीत्या धर्मप्रचाराच्या उपक्रमांत भाग घेतल्याबद्दल आणि देशात करोनाचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग केल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी बुधवारी २९४ विदेशी नागरिकांविरुद्ध आरोपपत्रे सादर केली.

मलेशिया, थायलंड, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आणि अनेक आफ्रिकी देशांसह १४ देशांच्या २९४ विदेशी नागरिकांविरुद्ध साकेत न्यायालयात १५ आरोपपत्रे सादर करण्यात आली. महानगर दंडाधिकारी सायमा जमील यांनी हे प्रकरण पुढील सुनावणीसाठी १७ जूनला ठेवले आहे. यापूर्वी मंगळवारी पोलिसांनी ८२ विदेशी नागरिकांविरुद्ध २० आरोपपत्रे दाखल केली होती.

नव्याने सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रांनुसार, कोविड-१९ महासाथीच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचा, तसेच संसर्गजन्य रोग कायद्यातील व आपदा व्यवस्थापन कायद्यातील नियमांचा आणि फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ अन्वये जारी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचा भंग केला.  व्हिसाच्या नियमांचा भंग करण्याशिवाय, या विदेशी नागरिकांनी अशी परिस्थिती निर्माण केली, जेणेकरून कोविड-१९ सारख्या अत्यंत संसर्गजन्य रोगाचा संसर्ग पसरला आणि त्यामुळे त्यांच्या साथीदारांचेच नव्हे, तर सामान्य जनतेचेही जीव धोक्यात आले, असे पोलिसांनी नमूद केले आहे.

तबलिगी जमातने मार्च महिन्यात दिल्लीच्या निझामुद्दीन भागात आयोजित केलेला मोठा धार्मिक मेळावा देशातील करोना विषाणूच्या अतिसंक्रमणाचे केंद्र ठरला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button