breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

#CoronaVirus : भारत-दक्षिण आफ्रिका वनडे मालिका रद्द

नवी दिल्ली | कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकादरम्यान सुरु असलेली एकदिवसीय सामन्यांची मालिका रद्द करण्यात आल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुरुवारी धर्मशाळा येथे पहिला एकदिवसीय सामना होणार होता.

परंतु, पावसामुळे हा सामना रद्द झाला होता. आता दि. १५ आणि १८ मार्च रोजी लखनऊ आणि कोलकाता येथे होणारे एकदिवसीय सामनाही रद्द करण्यात आल्याने ही मालिकाच रद्द झाली आहे.

यापूर्वी, कोरोना विषाणूमुळे हे दोन्ही सामने रिकाम्या स्टेडिअममध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, आता हे सामने रद्द करण्यात आले आहेत. तत्पूर्वी, कोरोना व्हायरस संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेची सुरुवात १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशातील एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यावर आयपीएलच्या नियामक परिषदेकडून शनिवारी शिक्कामोर्तब केले जाईल, अशी माहिती मिळते आहे. आयपीएलच्या नियामक परिषदेची बैठक शनिवारी होते आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button