breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

Delhi Voilence : दिल्ली दंगलीत पत्रकारांवर हल्ले

न्यूज डेस्क दिल्ली | मागील रविवार संध्याकाळपासून दिल्लीमध्ये दंगली सुरु झाल्या आहेत. आत्तापर्यंत ३८ जणांनी आपला जीव गमावल्याची माहिती मिळत आहे, तर अनेक लोक जखमी आहेत.

या दंगलींचे वार्तांकन करायला गेलेल्या कित्येक पत्रकारांनाही दंगलखोरांनी मारहाण केली आहे. त्यांचे फोन, कॅमेरे हिसकावून घेतले आहेत, तोडले आहेत. अनेकांना शिवीगाळीचा सामना करावा लागला आहे. एक पत्रकार बंदुकीच्या गोळीने जखमी झाला आहे.

मौजपूर येथे वार्तांकन करत असताना आकाशवर जमावाने गोळीबार केला. त्यांना जीटीबी रुग्णालयात दाखल केले गेले. “गोळी आत अडकली आहे आणि डॉक्टरांनी ऑपरेशन करून ती काढण्यात धोका आहे असे सांगितले आहे,” त्यांच्या भावाने न्यूजलॉंड्री या वृत्त संकेतस्थळाला सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button