breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘तिला मानसिक उपचाराची गरज’, केतकी चितळेवर अजितदादा भडकले

मुंबई : मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर अत्यंत अश्लाघ्य भाषेत टीका केली. आपल्या फेसबुक पेजवरुन तिने पवारांविषयी अत्यंत हीन भावना व्यक्त केला. नरक तुमची वाट बघत आहे, असं म्हणत पवारांच्या मरणाची इच्छा तिने व्यक्त केली. केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर युवती काँग्रेसच्या कार्यकर्तींनी तिच्यावर शाईफेकही केली. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मीडियाने प्रश्न विचारला असता, ते केतकीवर चांगलेच भडकले. ‘तिला मानसिक उपचाराची गरज आहे, कुठल्यातरी चांगल्या दवाखान्यात तिच्यावर उपचार करायला हवेत’, अशा शेलक्या शब्दात अजित पवार यांनी केतकीचा समाचार घेतला.

शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकी चितळे हिला रविवारी सकाळी ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने केतकी चितळे हिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे आता पोलीस कोठडीतील चौकशीत काय समोर येणार, हे पाहावे लागेल. केतकी चितळे हिने कोणताही वकील घेतला नव्हता. तिने न्यायालयात स्वत:च युक्तिवाद केला. यावेळी तिने आपण राजकीय व्यक्ती नसल्याचे सांगितले.

मला समाज माध्यमांवर माझे स्वत:चे मत मांडायचा अधिकार नाही का?, असा सवालही तिने विचारला. “असल्या प्रवृत्तींना मानसिक उपचाराची गरज आहे. एखाद्या चांगल्या दवाखान्यात, चांगल्या डॉक्टरांना तिला दाखवायला पाहिजे. तिच्यावर मानसिक उपचार होण्याची गरज आहे”, अशा शेलक्या शब्दात अजितदादांनी केतकीचा समाचार घेतला. “इतक्या खालच्या पातळीवर जाऊन कधीही कुणी बोलत नव्हतं. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्ताधारी पक्ष असो वा विरोधी पक्ष असो, कुणीही करु नये”, असं सांगत केतकीच्या विधानाचा आणि फेसबुक पोस्टचा अजितदादांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

केतकीच्या टीकेवर शरद पवार काय म्हणाले…?

“केतकी चितळे नावाच्या व्यक्तीला मी ओळखत नाही. तिने माझ्यावर काय टीका केली, हे देखील मला माहिती नाही. तिने काय म्हटलंय, हे जाणून घेतल्याशिवाय मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्याविरोधात तक्रारीचे सूर मी ऐकतोय. मी साताऱ्याच्या सभेत एका कवीच्या कवितेचा उल्लेख, त्याच्यावर काही लोकांनी टीका केली. जे वास्तव नव्हतं, ते सांगितलं गेलं”, असं पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button