breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: भारतात कोरोना विषाणूचा चौथा बळी

कोरोनामुळे भारतात चौथा बळी कर्नाटक, दिल्ली, मुंबई नंतर आता पंजाबमध्ये कोरोनाचा चौथा बळी गेला आहे… त्यामुळे कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या भारतात ४ वर पोहोचलीय.  

पंजाबमध्ये एका ७२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. ही व्यक्ती काही दिवसांपूर्वीच जर्मनीहून इटलीमार्गे परतली होती. पंजाबमधल्या नवानशहर जिल्ह्यातल्या रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. छातीत तीव्र वेदना होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. 

कोरोनामुळे जगभरात ९,११५ जणांचा मृत्यू झालाय. यातील सर्वाधिक मृत्यू चीनमधले आहेत. चीनच्या वुहानमधूनच कोरोना जगभरात पसरला. तर भारतात १७१ जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ४९ जणांचा समावेश आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button