breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पार्कींगच्या नावाखाली पिंपरी-चिंचवडकरांची लूट करण्याचे भाजपचे ‘धोरण’ – संजोग वाघेरे

  • 1 मार्चपासून शहरात भाजप राबविणार पार्कींग धोरण
  • शहरवासीयांकडून सत्ताधा-यांचा मलिदा उकळण्याचा डाव

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका बीआरटीएस विभागामार्फत शहरात 1 मार्चपासून पार्किग धोरण राबविण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी सर्व ठिकाणी एकाच खासगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु, देशात एकीकडे मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे इंधन दरवाढ झाली असून पेट्रोल शंभरी पार करत आहे. हा महागाईचा मारा सोसत असलेल्या नागरिकांकडून पिंपरी-चिंचवडमध्ये वाहने लावण्यासाठी सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखाली महापालिका पैसे उकळणार आहे. पार्कीगच्या नावाखाली पिंपरी-चिंचवडकरांची लूट करण्याचे भाजपचे हे धोरण आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे – पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केला आहे.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे – पाटील यांनी महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. पार्किग धोरणाबाबत भाजपवर टिका करताना संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे की, केंद्रातील मोदी सरकारने 2014 पासून आजपर्यंत वेळोवेळी घेतलेले निर्णय हे सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणारे आहेत. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत.  मोदी सरकारकडून नागरिकांवर सुरू असलेला हा महागाईचा हा मारा असह्य होत आहे. यात नागरिक सर्वसामान्य नागरिकांना वाहने वापरावीत किंवा नाही, असा प्रश्न पडतो आहे. परंतु, मोदी सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजप देखील काम करत आहे. अपापारदर्शक, भ्रष्टाचारी कारभार महानगरपालिकेत सुरू आहे. करदात्यांच्या करोडो रुपयांचा भाजपच्या नेतृत्वाखाली चुराडा केला जात आहे. तरी देखील शहरवासीयांकडून आणखी वेगवेगळ्या मार्गाने पैसे काढून आपली तिजोरी भरण्याचा हव्यास भाजपला सुरू आहे. त्यासाठी भाजपने शहरात पार्किंग धोरण राबविले आहे.

धोरण तत्काळ रद्द करा – वाघेरे

पार्किग धोरणाची पिंपरी-चिंचवड महानगरपालिका बीआरटीएस विभागामार्फत 1 मार्चपासून अंमलबजावणी करण्याची तयारी चालू आहे. शहरातील रस्त्यांची चार भागात विभागणी करून तेथे खासगी एजन्सीला कंत्राट देण्यात आले आहे. हे कंत्राट घेणारी एजन्सी सर्व ठिकाणी एकच असल्याचे समजले आहे. यावरून  इंधन दरवाढ, महागाईमुळे बेजार झालेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांकडून आता वाहने उभी करण्याची पैसे घेण्याचा डाव भाजपने केलेला आहे. शहरातील वाहतुकीचा शिस्त लावण्याचे कारण पुढे केले जात आहे. परंतु, या धोरणामागे सत्ताधारी भाजपचा खरा हेतू हा पिंपरी-चिंचवडकरांची लूट करण्याचा आणि त्यांना लुबाडण्याचा आहे. महानगरपालिकेने या धोरणाची अंमलबजावणी करू नये, हे धोरण तात्काळ रद्द करावे, असे संजोग वाघेरे पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button