breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा
#CoronaVirus | बुलडाणा जिल्हा झाला कोरोनामुक्त
बुलडाणा | बुलडाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी आहे. जिल्ह्यातील राहिलेल्या तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना बरे करून आज या तीनही रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्हा आता तरी कोरोणा मुक्त झालाय. जिल्ह्यात 24 कोरोनाग्रस्त होते. या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आता एकही कोरोना रुग्ण नाही.
बुलढाणा जिल्ह्यात आरोग्य विभाग आणि पोलीस विभाग चोख भूमिका बजावत आहेत. जिल्ह्यातील नागरिकांच्या सहकार्याने जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. 24 कोरोना रुगांना टप्याटप्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. महाराष्ट्रभर कोरोनाचा शिरकाव होत असताना बुलडाणा जिल्हा कोरोनामुक्त झाला.