#CoronaVirus: बीड जिल्ह्यात आणखी सातजण कोरोनाबाधित
करोना टाळेबंदी लागू झाल्यानंतर 50 दिवसानंतर शनिवारी चोरट्या मार्गाने मुंबई-पुण्यातून आलेल्या दोघांना करोनाची लागण झाल्याचा अहवाल आला आणि जिल्हात कोरोनाचा प्रवेश झाला. तर आष्टी तालुक्यातील नगर जिल्ह्यातून असलेल्या सात जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल रविवारी रात्री धडकला. त्यामुळे २४ तासांत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ९ पोहोचला आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना टाळेबंदी सुरु झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी करत. पन्नास दिवस करोनाचा शिरकाव रोखला होता. मात्र मुंबई-पुण्याहून विना परवानगी चोरट्या मार्गाने जिल्ह्यात दाखल झालेल्या दोघांना करोनाची बाधा झाल्याचे शनिवारी रात्री तपासणी अहवालातून स्पष्ट झाले. तर मूळ नगर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आणि मुंबईत राहत असलेले नागरिक बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील नातेवाईकांच्या मदतीने परवानगी घेऊन १३ मे रोजी दाखल झाले होते. यातील काहींना त्रास होऊ लागल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. रविवारी रात्री यातील सात जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे 24 तासांत जिल्ह्यातील करोनाबाधीत रुग्णांची संख्या ९ झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद 31 मे पर्यंत टाळेबंदी व संचारबंदीचे नियम पुर्वीप्रमाणेच अधिक कडक केले आहेत.