breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus | बाळाला जन्म दिल्यानंतर महिला निघाली कोरोना पॉझिटिव्ह
पंढरपूर | कोरोनाच्या संकटकाळात गरोदर महिलांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मोहोळ तालुक्यातील महिलेची पंढरपुर येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रसुती झाली. मात्र बाळाला जन्म दिल्यानंतर ही महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हॉस्पिटलमध्येच ही महिला कोरोनाग्रस्त असल्याचं आढळून आल्याने पंढरपूकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
या महिलेच्या संपर्कात आलेल्या 10 डॉक्टरांसह तब्बल 47 जणांना क्वारन्टाइन करण्यात आलं आहे. तसंच या महिलेच्या बाळाचेही स्वॅब घेण्यात येणार आहेत. या बाळाचा अहवाल निगेटिव्ह यावा, यासाठी आता सर्वजण प्रार्थना करत आहेत.