TOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडराजकारणराष्ट्रिय

माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांची भाजपा प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

पिंपरी : भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बांधणीमध्ये अत्यंत महत्त्वाची जबाबदारी म्हणून ओळखला जाणाऱ्या भाजपा निमंत्रित सदस्य पदी माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र देण्यात आले.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीच्या पक्ष संघटनात्मक बांधण्यासाठी चंद्रकांत नखाते यांची भाजपच्या निमंत्रित सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रकांत नखाते हे रहाटणी, काळेवाडी परिसराचे नेतृत्व करतात. १९९७ साली वेगळा वार्ड अस्तित्वात आला. प्रथमच महिला आरक्षण मिळाल्यामुळे राजकीय वाटचाली मधील अपक्ष महिला म्हणून चंद्रकांत नखाते यांच्या सुविद्य पत्नी सौ. सविता चंद्रकांत नखाते ह्या १९९७ साली नगरसेविका झाल्या. चंद्रकात नखाते हे रहाटणी रहिवाशी कल्याणकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच रहाटणी थेरगाव व्यापारी संघटना, जोगेश्वरी प्रासादिक दिंडी रहाटणी गावं याचे देखील ते अध्यक्ष आहेत. पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच हाय कोर्टातून प्राधिकरण संदर्भात स्टे आणण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. २००२ मध्ये चंद्रकांत नखाते यांची प्रथमच मनपा नगरसेवक पदी नियुक्ती झाली होती.
२०१७ च्या निवडणुकीमध्ये भाजप पक्षाच्या तिकिटावर दणदणीत विजय मिळवून संपूर्ण पॅनल निवडून आणण्यात त्यांचे मोठे योगदान होते. तसेच २०२१ ते २०२२ मध्ये (PMRDA) सदस्य म्हणून नियुक्ती झाली व कार्यभार सांभाळला. २०१७ ते २०२२ या कालावधीत साधारणपणे रहाटणी परिसरात ३७५ कोटी रुपयांच्या विकास कामांना स्वतः तरतुद करून मंजुरी मिळवली व रहाटणी गाव स्मार्ट सिटी नसूनही रहाटणीस स्मार्ट- सिटीचा दर्जा मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान होते. रहाटणी गाव येथे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पूर्वी अर्धाकृती स्मारक होते. त्या जागी भारतातील सर्वात प्रथम अश्वाच्या केवळ मागील दोन पायावरील अश्वारूढ असलेला तसेच ४ टनी वजनी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य स्मारकाची उभारणी करण्यात चंद्रकांत नखाते यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button