breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: पोलिसांना पीपीई किट; शर्मिला ठाकरे यांच्याकडून वाटप सुरू
राज्यात लॉकडाउनच्या काळात सुरक्षा व्यवस्थेचं काम करणाऱ्या पोलिसांच्या जिवाला करोनामुळे धोका निर्माण झाला आहे. अनेक पोलिसांनाही करोनाचा संसर्ग झाल्याचंही समोर आलं. पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मनसेनं पुढाकार घेतला आहे. शर्मिला राज ठाकरे आणि रिटा गुप्ता यांच्या सावित्री प्रतिष्ठानच्या वतीनं मुंबईतील करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या भागातील पोलिसांना पीपीई किटचं वाटप करण्यात आलं.
सौ. शर्मिला राज ठाकरे, मनसे सरचिटणीस सौ. रिटा गुप्ता ह्यांच्या सावित्री प्रतिष्ठानतर्फे मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या अंधेरी, सहार, पायधुनी, साकीनाका, विक्रोळी, पंतनगर, गोरेगांव, देवनार, कांजूरमार्ग भागात पोलिसांसाठी पर्सनल प्रोटेक्शन किट (पीपीई)चं वाटप सुरु. #लढाकोरोनाशी pic.twitter.com/Jw79wpass5
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 12, 2020