breaking-newsपुणे

#CoronaVirus: पोलिसांकडून सहलींना सक्त मनाई

पुणे | महाईन्यूज

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांना देशांतर्गत व परदेश सहली काढण्यास पुणे पोलिसांनी मनाई केली आहे. अपवादात्मक परिस्थितीसाठी पोलिस आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. याबरोबरच विमानातून आलेल्या व शहरातील सर्व हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाउसमध्ये उतरलेल्या परदेशी व भारतीय प्रवाशांची माहिती पोलिस, जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयास कळविणे बंधनकारक केले असून, याबाबतचा आदेश पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिला आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी, हॉटेल, लॉज, गेस्ट हाउस आहेत. तेथे विमानाद्वारे परदेशातून आलेले परदेशी व भारतीय प्रवासी वास्तव्यास असतात. त्या संबंधित प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करणे आवश्‍यक आहे. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांनुसार, देशांतर्गत व परदेशी सहलींवर बंधने घातली आहेत. त्यादृष्टीने हे आदेश सहआयुक्त डॉ. शिसवे यांनी दिले. पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी, हॉटेल, लॉजेस, गेस्ट हाउस यांनी रजिस्टर बनवून त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरून विमान प्रवास करून आलेल्या, शहरात वास्तव्यास असलेल्या परदेशी व भारतीय प्रवाशांची सविस्तर नोंदणी करावी लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button