breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटच्या वसतिगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या

पुणे : पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या वसतिगृहामध्ये एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी (ता.५) सकाळ नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

अश्विन अनुराग शुक्ला (३२, रा, गोवा) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अश्विन शुक्ला हा एफटीआयआय मधील मुलांच्या वसतिगृहातील एस १२ बी ब्लॉक रूममध्ये राहत होता. आज (शुक्रवार) सकाळी नऊच्या सुमारास एफटीआयआय मधील एक रूम आतमधून बंद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या घटनेची माहिती मिळताच, डेक्कन पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी खिडकीतून पाहिल्यानंतर आतमध्ये तरुणाने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करून तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, शुक्ला याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरी, पुढील तपास डेक्कन पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button