breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात व्यापार बंद, महत्वाच्या ठिकाणी जमावबंदी

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 39 वर पोहोचली आहे. खबरदारी म्हणून पुण्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाबाधित 16 रुग्णांची प्रकृती स्थिर असून 27 जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्याचं अहवालात समोर आलं आहे. पण रुग्णांचा वाढता आकडा पाहता पुण्यात बाजारपेठांसह सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुढील 3 दिवस व्यापार बंद राहणार आहे. किराणा, जीवनावश्यक वस्तू, दूध डेरीज, औषधं, भाजीपाला, फळं वगळता इतर दुकानं बंद राहणार असल्य़ाची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पुण्यात संचारबंदी नसून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोक एकावेळी गर्दी करून उभे राहू शकत नाही.

आजपासून पुण्यात याठिकाणी बंदचा निर्णय

– तुळशीबाग पाठोपाठ सुप्रसिद्ध हॉंगकॉंग लेन शॉपिंग ही 3 दिवस बंद राहणार आहे.

– सावित्रीबाई फुले आणि पुणे विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढं ढकलल्या

– ग्रामदैवत कसबा गणपतीचंही दर्शन बंद

– कोर्टाचे काम फक्त 11 ते 2 असं 3 तास चालणार

– येरवडा जेलमधून व्हिडिओद्वारे कैद्यांशी संपर्क करणार. कैद्यांना कोर्टात आणणार नाही

– 21 दिवस चाललेलं फुरसुंगी, उरुळी ग्रामस्थांचं कचरा विरोधी आंदोलन स्थगित

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button