breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: पुण्यात दिवसभरात 94 कोरोना बाधित रुग्ण, दोन रुग्णांचा मृत्यू
पुणे शहरात करोना विषाणूं बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज दिवसभरात 94 रुग्ण आढळले असून यामुळे पुणे शहराची 1432 एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून आज अखेर पर्यंत 81 मृतांची संख्या झाली. त्याच बरोबर 14 दिवसा नंतर 27 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, या सर्वांना आज घरी सोडण्यात आले. पुणे शहरात 230 जण करोना मुक्त झाले आहेत.