breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कर्नाटक, गुजरात व दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन होणार नाही

नवी दिल्ली | देशात सोमवारी ११५०२ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या आता ३,३२,४२४ झाली आहे. संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा येत्या दोन दिवसांत सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. मंगळवारी दुपारी ३ वाजता २१ राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रशासकांशी मोदी चर्चा करतील, तर बुधवारी होणाऱ्या बैठकीत उर्वरित १५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री सहभागी होतील.

दरम्यान, वाढत्या संसर्गामुळे देशात पुन्हा लॉकडाऊन लावण्याबाबत चर्चा रंगताहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानिसामी यांनी चेन्नई आणि शेजारच्या तीन जिल्ह्यांत १९ ते ३० जूनपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या काळात रविवारी तेथे पूर्णपणे शटडाऊन राहील, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी अंदाज चुकीचे ठरवत लॉकडाऊन लावण्याची योजना नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, देशात सर्वाधिक बाधित मुंबईत सोमवारपासून लोकल सुरू झाल्या. तूर्तास अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच लोकलमधून प्रवासाची परवानगी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button