breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

#CoronaVirus: पुण्यातील गणेशोत्सवाची नियमावली ठरली, बाप्पाच्या मिरवणुकीसह ‘या’ गोष्टींना मनाई

पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पुण्यात गणेश उत्सवा संदर्भात काटेकोर नियमावली ठरवण्यात आलेली आहे. गणेश मंडळांच्या बैठकीत सर्वांची मतं आणि सूचना जाणून घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाने ही नियमावली बनवलेली आहे. या बैठकीतील निर्णयाप्रमाणे गणपती बाप्पाच्या मिरवणुकीस मनाई करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बाप्पासाठी मांडव उभारण्यासही मनाई करण्यात आली आहे. याशिवाय देखावे सादर करण्यास आणि गर्दी जमवण्यासह मनाई करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने बोलावलेल्या या बैठकीत गणेश मंडळांनीही प्रशासकीय यंत्रणांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. उत्सवाच्या बाबतीत कुणासोबतही दूजाभाव होऊ नये, शहरातील सर्व मंडळांसाठी सारखेच नियम असावेत, अशी मागणी या गणेश मंडळांनी केलेली आहे. तसेच सर्वांना नियम सारखे असतील तरच सर्व गणेश मंडळांचे सहकार्य लाभेल, असं मत मंडळाच्यावतीने मांडण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button