breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

“चलो गोर राजसत्ता की ओर”; पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय बंजारा परिषद संघटनेची बैठक

राष्ट्रीय बंजारा परिषद ही समाजातील ताकतवर संघटना..युवकांनी यात मोठ्या संख्येने सामील व्हावे – अमोल पवार

राष्ट्रीय बंजारा परिषद मुळे समाजात नवीन दिशा देणारी पिढी निर्माण होईल – प्रेमकिशन राठोड

पुणे : राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या अंतर्गत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात बैठक घेण्यात आली. यावेळी संघटनेचे राज्य सोशल मीडिया संघटक नेते अमोल पवार व राष्ट्रीय बंजारा परिषदेचे जिल्हा संघटक प्रेमकिशन राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय बंजारा परिषद मध्ये चालू असलेल्या पदाधिकारी निवडी बद्दल प्रेमकिशन राठोड यांनी समाज बांधवांना माहिती दिली.

राष्ट्रीय बंजारा परिषदे मुळे भविष्यात समाजात नविन दिशा देणारी पिढी निर्माण होईल आणि खऱ्या अर्थाने त्या करीता सामाजिक कार्यात सामील होण्याचे आहवान त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले. दि. 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अधिवेशन बद्दल माहिती देऊन त्यात सामील होण्यासाठी आवाहन प्रेमकिशन राठोड यांनी यावेळी केले.

खेड तालुक्यातील समाज बांधवांन मध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. राष्ट्रीय बंजारा परिषद मध्ये काम करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील बांधवा‌ मध्ये सर्वाधिक उत्साह दिसून येते आहे. अनेक इच्छुक असणारे युवक ज्येष्ठ, श्रेष्ठ सामाजिक कार्यकर्ते काम करण्यासाठी इच्छुक आहेत. लवकरच पुणे जिल्ह्यातील इच्छुक असणाऱ्या पदाधिकारी यांची यादी आदर्शवत व्यक्तिमत्व असलेले मा.किसनभाऊ राठोड यांचें कडे सुपुर्द केल्या नंतर त्यांतून नियुक्ती करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

अमोल पवार यांनी देखील उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले व राष्ट्रीय बंजारा परिषद ही, समाजातील ताकतवर संघटना असून यात मोठ्या संख्येने समाज बांधवांना सामील होण्यासाठी आवाहन केले आहे.

यावेळी खेड तालुक्यातील युवा नेते रमेश जाधव, अनिकेत जाधव, भारत राठोड, रमेश राठोड, उमेश चव्हाण, अनंता राठोड, उमेश राठोड, अरविंद जाधव, सुधाकर राठोड, पूनमचंद राठोड, सुनील पवार, सुनील राठोड, चेतन जाधव, रंजीत राठोड, रजीत उमेश राठोड, ओंकार राठोड, ऋषिकेश राठोड, पवन राठोड, माही राठोड, आकाश राठोड, रोशन राठोड, प्रवीण राठोड व इतर यूवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button