breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बालेवाडी स्टेडियममध्ये तोडफोड केल्याने पोलिसांनी तीघांना घेतले ताब्यात

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – बालेवाडी स्टेडियममध्ये बेकायदेशीररित्या घोषणाबाजी करून स्टॉलची तोडफोड केली. तसेच, रास्तारोको केल्यामुळे तीनजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना शनिवारी (दि. 5) दुपारी सव्वातीनच्या सुमारास बालेवाडी स्टेडियमवर घडली.

प्रशांत लालसिंग धुमाळ (वय 36, रा. शिवाजी नगर गावठाण, पुणे) आणि अन्य दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हिंजवडी पोलिसांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत याने त्याच्या साथीदारांना सोबत घेऊन बालेवाडी स्टेडियम येथे बेकायदेशीररित्या घोषणाबाजी करत आंदोलन केले. लॉन टेनिस स्टेडियमच्या बाहेर असलेल्या प्रदर्शन स्टॉलची तोडफोड करून दोन हजार रुपयांचे नुकसान केले. स्टेडियममधील लॉन टेनिस ते शिवाजी पुतळा या मार्गावरील रस्ता अडवून प्रेक्षक, क्रीडा संकुलातील स्टाफ आणि राष्ट्रीय खेळाडूंना येण्या-जाण्यासाठी अडथळा निर्माण केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button