breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुणे, पिंपरी चिंचवडमधील अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

पुणे |महाईन्यूज|

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संबंधित जिल्हाधिकारी तसेच पालिका आयुक्तांकडून परिस्थितीचा आढावा घेतला.

तसेच राज्याच्या कोकण, पश्चिम व मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, विदर्भासह अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेती व घरांचे नुकसान झाले आहे, या नुकसानीची माहिती घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित नुकसानीचे पंचनामे तात्काळ सुरु करावेत असे आदेश दिले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात राज्यातील पुरस्थितीचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अनेक वसाहतीत पाणी शिरल्याचा व झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन मदतकार्य तातडीने सुरु करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले. हवामानखात्याने दिलेल्या इशाऱ्याची नोंद घेऊन नागरिकांनी खबरदारी घ्यावी.

पोलिस व प्रशासनाने सतर्क रहावे अशा सूचनाही अजित पवार यांनी संबंधित जिल्हा व पोलिस प्रमुखांना दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सतर्क राहण्याचे व बचाव, मदतकार्य तत्परतेने करण्याचे निर्देश दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button