breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#CoronaVirus: आधी तबलिगींकडून कोरोनाचा प्रसार, आता कोरोना योद्धा झाल्याचा दावा; नक्वींनी फटकारलं

देशात सध्या करोनानं थैमान घातलं आहे. दिल्लीतील निझामुद्दीनमध्ये पार पडलेल्या तबलिगींच्या कार्यक्रमानंतर त्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही तबलिगींना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यापैकी काही तबलिगी देशातील विविध भागांमध्ये गेल्यामुळे करोनाचा प्रसार झाल्याचं वृत्तही आलं होतं. आता करोनातून बाहेर आलेल्या तबलिगींनी करोनाग्रस्तांसाठी प्लाझ्मा देण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. यावरून केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी तबलिगींना फटकारलं आहे. करोनाचा प्रसार करणारे आता स्वत:ला करोना योद्धा म्हणवून घेत आहेत, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button