breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

आरबीआयकडून पेटीएम पेमेंट्स बँकेला शेड्यूल पेमेंट्स बँकेचा दर्जा!

नवी दिल्ली – पेटीएमच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेला शेड्यूल पेमेंट्स बँकेचा दर्जा दिला आहे. आरबीआयने कायदा, 1934 अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. सप्टेंबरमध्येच हा निर्णय झाला होता. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये आरबीआयने त्याची अधिसूचना जारी केली होती. मात्र, पेटीएम पेमेंट्स बँकेने काल गुरुवार, ९ डिसेंबर रोजी याबाबत घोषणा केली. त्यानुसार, शेड्यूल्ड पेमेंट बँक असल्याने आता पेटीएम नव्या व्यवसाय संधींवर लक्ष केंद्रित करू शकते. दरम्यान, मागील काही सत्रात घसरणीचा सामना करत असलेल्या पेटीएमच्या शेअरने आरबीआयच्या या निर्णयामुळे जवळपास ५ टक्क्यांची उसळी घेतली.

अलिकडेच पेटीएमने आपला महाआयपीओ जारी केला होता, मात्र बाजारात त्याला खूप वाईट प्रतिसाद मिळाला. हा आयपीओ घसरणीसह सूचीबद्ध झाला. त्यानंतर काही दिवसांतच पेटीएमच्या शेअरची घसरण ४१ टक्क्यांवर पोहोचली. मात्र काल, पेटीएम पेमेंट्स बँकेला शेड्यूल्ड बँकेचा दर्जा मिळाल्यानंतर कंपनीच्या शेअरची किंमत सुमारे ५ टक्क्यांनी वाढून १,६४५ रुपये झाली, तर आधी पेटीएमचा शेअर लाल चिन्हात व्यवहार करत होता.

शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळाल्याने आता पेटीएम पेमेंट्स बँक सरकार आणि इतर मोठ्या कंपन्यांच्या रिक्वेस्ट फॉर प्रपोजलमध्ये सहभागी होऊ शकणार आहे. याशिवाय कंपनीला प्राथमिक लिलावातही हजेरी लावता येणार आहे. त्याचबरोबर निश्चित दर, बदलते रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्येदेखील सहभागी होऊ शकेल. इतकेच नाही तर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीसाठी भागीदार बनू शकेल. तसेच पेटीएम पेमेंट्स बँक आता सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या आर्थिक समावेश योजनांमध्ये सहभागी होण्यास पात्र आहे.

पेटीएमचे प्रमुख विजय शेखर शर्मा हे ११ अर्जदारांपैकी एक होते ज्यांना २०१५ साली पेमेंट बँक स्थापन करण्यासाठी तत्वतः मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर पेटीएम पेमेंट्स बँकेने आरबीआयकडून बँकिंग नियमन कायद्याच्या कलम २२ (१) अंतर्गत भारतात पेमेंट व्यवसाय करण्यासाठी परवाना मिळाल्यानंतर २३ मे २०१७ पासून पेमेंट बँक म्हणून काम सुरू केले होते.

भारतातील पेमेंट बँकेचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी मार्च २०२१ पर्यंत पेटीएम पेमेंट्स बँकेकडे ६४ दशलक्ष बचत खाती आणि ५,२०० कोटींहून अधिक ठेवी होत्या, त्यात बचत खाती, चालू खाती आणि भागीदार बँकांमधील मुदत ठेवी यांचा समावेश आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button