breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गोरगरीबांच्या घरांना बिल्डर लाॅबीचा विरोध

– सर्व सामान्याना प्राधिकरणाची घरे मिळू नयेत म्हणून होतोय प्रयत्न – काशिनाथ नखाते
पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून गोरगरीब, कष्टकरी, सर्वसामान्य माणसांसाठी गृहप्रकल्प योजना होऊ नयेत, म्हणून बांधकाम व्यावसायिक विरोध करीत आहेत. त्यात शहरातील काही राजकारणी मंडळीही सहभागी आहेत. त्यामुळे त्यांचा विरोध झुगारुन गृहप्रकल्प पुर्ण करुन सर्वसामान्य घरांची योजना पुर्ण करावी, अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघाने प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे केली आहे.
यावेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, इरफान चौधरी, चंद्रकांत कुंभार, सैफुल शेख , आबा शेलार , बालाजी इंगले, राजेश माने उपस्थित होते. महासंघाचे शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता अनिल सूर्यंवंशी यांच्याशी चर्चा केली.
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकारणाकडून गोरगरीब, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना घरे देणार याविषयी अनेक वर्षापासून केवळ घोषणाच केली जात आहे. गेल्या कित्येक वर्षानुवर्षे सर्वसामान्याना घराची आशा दाखवली जात होती. त्यामुळे नवनगर प्राधिकरणाने सेक्टर ३० आणि ३२ याठिकाणी घराचा प्रकल्प सुरु केला आहे. त्या प्रकल्पाला काही जणाकडून खोडा घातला जात आहे.
सन २०१६ मध्ये पेठ क्रमांक ३० व ३२  निविदा प्रक्रिया राबवुंन  प्रकल्प सुरु करण्याचे आदेश दिले. मात्र उदघाटनापूर्वीच विविध करणानानी त्यास विरोध झाला. यावेळी महासंघाने आंदोलने करुन अखेर त्या कामास सुरूवात झाली, आता दुर्दैवाने तीन वर्षे उलटले  तरीही केवळ २५% म्हणजे एक मजला व दोन मजली काम झाले आहे. हे काम करणाऱ्या ठेकेदारास सुमारे ५० लखाचा दंड लावला असला तरीही दंड लाऊन न थांबता काम पुढे झाले पाहिजे अशी व्यवस्था करावी .
तसेच पेठ कृ.१२ येथे होणारी  सुमारे ५०००  घरांची योजना  विरोध विचारात न घेता सर्वसामान्याना घरे देण्याच्या उद्देशाने नियमाप्रमाने काम  लवकरात लवकर सुरु करावे, नागरिकांना परवडणारी घरे द्यावीत, अशी मागणी यावेळी केली. अन्यथा कष्टकाऱ्यांच्या योजनेसाठी आंदोलन करण्यात येईल. असाही इशारा देण्यात आला.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button