breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

U19 World Cup : टीम इंडियाने मिळवलं फायनलचं तिकीट

IND vs SA Under-19 : अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेमीफायनल सामना विलोमूर पार्क, बेनोनी येथे खेळवला गेला. या रोमांचक सामन्यात टीम इंडियाच्या नव्या छाव्यांनी दमदार कामगिरी करत फायनलचं  तिकीट मिळवलं आहे. उदय सहारनच्या  नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग ५ विजय नोंदवले होते, आता त्याल ६ व्या विजयाची नोंद झाली आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाला २४५ धावांचं आव्हान मिळालं होतं. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना सचिन धस  याच्या ९६ धावांच्या वादळी खेळीमुळे टीम इंडियाला ९ व्यांदा फायनलमध्ये पोहोचता आलंय. टीम इंडियाने साऊथ अफ्रिकेचा २ विकेट्सने पराभव केला आहे.

दक्षिण आफ्रिकेने ल्हुआन-ड्रे प्रिटोरि याच्या ७६ धावांच्या खेळीच्या जोरावर ५० ओव्हरमध्ये ७ विकेट्स गमावून २४४ धावा केल्या होत्या. तर रिचर्ड सेलेट्सवेन याने ६४ धावांची भन्नाट खेळी केली. अखेरच्या १० ओव्हरमध्ये साऊथ अफ्रिकेचं पारडं जड झालं. त्यांन शेवटच्या ६० बॉलमध्ये ८१ धावा खोदून काढल्या. त्यामुळे साऊथ अफ्रिकेला २४४ धावा करता आल्या. टीम इंडियाकडून राज लिंबानी याने तीन महत्त्वाच्या विकेट्स काढल्या. तर नमन तिवारी आणि सौम्य पांडेला १-१ विकेट मिळाली. तर चमकदार कामगिरी करणाऱ्या मुशीर खान याने २ गडी बाद केले.

हेही वाचा – धमक होती तर काढा ना स्वत:चा पक्ष, कुणी अडवलं होतं? अजितदादांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी २४५ धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. आदर्श सिंग, अर्शिन कुलकर्णी आणि मुशीर खान यांना मोठी कामगिरी करता आली नाही. मात्र, कॅप्टन उदय सहारन पाय खोवून उभा राहिला. त्याला सचिन धस याची मोलाची साथ मिळाली. सचिन धस शतकापासून ४ धावा लांब राहिला. त्याने ९६ धावांची खेळी केली. अखेरच्या तीन ओव्हरमध्ये १९ धावांची गरज होती. मात्र, उदयने अखेरपर्यंत झुंज दिली. राज लिंबानी याने विजयी चौकार खेचत फायनलची कवाडं उघडली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button