breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू
देशातील करोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत असताना चिंतेत भर टाकणारी बाब म्हणजे मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. अशातच पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या आणि सुवर्ण मंदिरात हजुरी रागी काम केलेल्या व्यक्तीचा करोनानं मृत्यू झाला आहे. पंजाबच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. अमृतसरमधील जीसीएमएच रुग्णालयात या व्यक्तीला दाखल करण्यात आलं होतं. करोना झाल्याचं निदान झाल्यानंतर या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.