breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: कोरोनाविरूद्ध अखेर लष्कर मैदानात! ८ हजार वैद्यकीय कर्मचारी, ९ हजार बेड सज्ज

देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचदरम्यान बुधवारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना करोनाच्या संकटाशी लढण्यासाठी सैन्य दलानं केलेल्या तयारीची माहिती दिली. करोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी ९ हजारांपेक्षा अधिक बेड सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती रावत यांनी दिली.

याव्यतिरिक्त ८ हजार ५०० पेक्षा अधिक डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी तयार असल्याची माहिती लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी दिली. गरज भासल्यास सामान्य नागरिकांना या सेवा उपलब्ध करण्यात येतील. तसंच नेपाळलाही करोनाचा सामना करण्यासाठी लवकरच मदत पोहोचवली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

गेल्या पाच दिवसांमध्ये देशात निरनिराळ्या ठिकाणी तब्बल २५ टन वैद्यकीय साधन सामग्री पोहोवली असल्याची माहिती हवाईदल प्रमुख आरकेएस भदोरिया यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना दिली. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता खबरदारीचा उपाय म्हणून हवाईदलाची आवश्यक ती कामं सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान, काही दिवसांपूर्वी लष्कराचे एक डॉक्टर करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या ३० अधिकाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत संरक्षण मंत्र्यांशी ही चर्चा महत्त्वाची मानली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button