breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#CoronaVirus: पंतप्रधान मोदींच्या आईंनी पीएम केअर्स फंडाला दिली २५ हजाराची देणगी

करोना व्हायरसच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पंतप्रधान केअर्स फंडाला नरेंद्र मोदी यांच्या आई हिरा बेन यांची २५ हजार रुपयांची देणगी दिली आहे. त्यांनी आपल्या बचतीमधून ही रक्कम पंतप्रधान फंडाला दिली आहे. सरकारी सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली.

हिरा बेन ९८ वर्षांच्या असून त्या गुजरात गांधीनगरमधील रायसीन गावात नरेंद्र मोदींचे लहान बंधु पंकज मोदींसोबत राहतात. पंतप्रधान मोदींनी केलेल्या जनता कर्फ्यूलाही त्यांनी थाळीनाद करुन प्रतिसाद दिला होता. आपातकालीन परिस्थितीसाठी हा फंड बनवण्यात आला आहे. करोना व्हायरसविरोधात सुरु असलेल्या लढाईला सर्वसामान्य या फंडाच्या माध्यमातून हातभार लावू शकतात.

करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वसामान्यांबरोबर देशभरातील उद्योगपती आपल्यापरीने मदतीचा हात पुढे करत आहेत. टाटा ग्रुपने १५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केल्यानंतर मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने मदत जाहीर केली. आपतकालीन परिस्थितीसाठी असलेल्या पंतप्रधान नागरीक सहाय्यता निधीला म्हणजे पीएम केअर्स फंडाला रिलायन्स इंडस्ट्रीजने ५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. टाटा समूहाने शनिवारी आजवरची सर्वात मोठी आर्थिक मदत जाहीर केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button