breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: …तरीच महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत – नितेश राणे
भाजपा आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली असून चुकीच्या निर्णयाची मालिकाच सुरु केली आहे असं म्हटलं आहे. नितेश राणे यांनी संचारबंदीच्या काळात रस्त्यांची कामे सुरु करा असा आदेश निघाला आहे! मग या संबंधित सगळ्याच गोष्टी सुरु होणार. मग या कामगारांचं आयुष्य धोक्यात येत नाही का? असा सवाल विचारला आहे. तरीच महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढत आहेत अशी टीकाही यावेळी त्यांनी केली आहे.