TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मिशन- २०२२ : शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची घोडदौड सुरूच!

– सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक राष्ट्रवादीत आणण्यासाठी ‘शेलारमामा’ आघाडीवर
– आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विजयाचे ठरणार शिल्पकार

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत. पक्षाची ताकद वाढताना दिसत आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा समोर आव्हान राष्ट्रवादीकडून उभे केले जात आहे. भविष्यात आणखी किती नगरसेवक सत्ताधारी पक्षाला रामराम करून राष्ट्रवादीत दाखल होतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र, सध्यातरी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची घोडदौड सुरूच असल्याचे दिसते.
गेल्या वर्षभरात पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चांगलीच आक्रमक झाली आहे. सत्ताधारी भाजपाच्या विरोधात आक्रमक आंदोलने घेत आहे. अनेकदा महापालिकेवर मोर्चा आणला आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील हे सातत्याने सत्ताधारी भाजपाच्या विरोधात निवेदन आणि आंदोलनाच्या माध्यमातून हल्लाबोल करीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चांगलीच चर्चेत आहे. त्यामध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाने आणखी भर पडताना दिसत आहे.
सत्ताधारी भाजपाच्या महापालिकेतील महिला व बालकल्याण समितीच्या सभापती चंदा लोखंडे यांचे पती राजू लोखंडे यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला आहे. तर नुकतेच थेरगाव येथील नगरसेविका माया भरणे यांचे पती संतोष बारणे यांनी देखील राष्ट्रवादीचे घड्याळ आपल्या हातात बांधले आहे. सत्ताधारी भाजपचे नगरसेवक पक्षाकडे वळवण्यात शहराध्यक्ष संजय वाघेरे पाटील यांना यश येताना दिसत आहे. आगामी महापालिकेच्या तोंडावर सत्ताधारी भाजपा पुढे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आव्हान उभे करणार हे मात्र नक्की.

सत्ता आणण्याचा राष्ट्रवादीचा निर्धार …
गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात सत्ताधारी भाजपाच्या विरोधात राष्ट्रवादीने रान तापविले आहे. आंदोलने, निवेदने, सत्ताधारी भाजपातील नाराजांचे मन वळवणे आदी माध्यमातून राष्ट्रवादी चांगलीच सक्रिय झाल्याचे दिसते. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने केला असल्याची चर्चा होत आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी पुन्हा…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घातले आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, युवा नेते पार्थ पवार यांच्या मदतीने बूथ नियोजन आणि प्रभाग रचनेबाबत राष्ट्रवादीचे नेते बारीक लक्ष ठेवून आहेत. सत्ताधारी भाजपाच्या स्थानिक नेत्यांवर नाराज असलेले ९ ते १० नगरसेवक लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असे सांगीतले जात आहे. त्यामुळे महापालिकेत ‘राष्ट्रवादी पुन्हा’ असे चित्र निर्माण होवू लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button