breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

#CoronaVirus | नेटफ्लिक्स बेरोजगार झालेल्या चित्रपटातील कर्मचा-यांना करणार 750 कोटी रुपयांची मदत

डेस्क | कोरोनाव्हायरसमुळे नोकरी गमावलेल्या चित्रपट क्षेत्रातील लोकांसाठी नेटफ्लिक्सने 100 मिलियन डॉलरचा मदत निधी तयार केला आहे. हे पैसे बेरोजगार झालेल्या क्रू मेंबर्सना दिले जातील. नेटफ्लिक्सचे चीफ कंटेंट ऑफिसर टेड सैरांडोस म्हणाले की, कोविड 19 ने अनेक उद्योग बंद केले आहेत. जवळजवळ सर्व टीव्ही आणि चित्रपटांची निर्मिती बंद आहे, ज्यामुळे कलाकार आणि क्रूजवळ नोकरी राहिली नाही.

कंपनीने म्हटले आहे, ज्या लोकांनी काम गमावले आहे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रीशियन, कारपेंटर्स आणि ड्रायव्हर्स यांचा समावेश आहे. या सर्व लोकांनी नेटफ्लिक्सला चांगल्या काळात पाठिंबा दर्शविला आहे आणि आता आम्ही त्यांच्या वाईट काळात त्यांना साथ देतोय.

संस्था सरकारवर दबाव आणत आहेत :

कोरोनामुळे बंद पडलेल्या एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीतील एक लाखाहून अधिक लोक बेरोजगार झाले आहेत. अशा परिस्थितीत IATSE आणि SAG-AFTRA सारख्या संस्था सरकारकडे सदस्यांना मदत करण्याची मागणी करत आहे. याव्यतिरिक्त, नेटफ्लिक्स 15 मिलिन डॉलर बाहेर काम करत असलेल्या क्रूच्या मदतीसाठी संस्थांना देणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button