breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

#CoronaVirus |…तरीही सहा देशांमध्ये आठ स्पर्धा सुरूच

मिंस्क | कोरोना व्हायरसचा धाेका लक्षात घेऊन अनेक स्पर्धा रद्दचा निर्णय घेतला आहे. मात्र, या व्हायरसची भीती कायम असतानाही दुसरीकडे सहा देशांत सर्रासपणे आठ स्पर्धा खेळवल्या जात आहेत. यामध्ये फुटबाॅलच्या पाच आणि रग्बीच्या दाेन माेठ्या स्पर्धांचा समावेश आहे.

मात्र, या स्पर्धेतील सामन्यादरम्यान काेणत्याही स्टेडियममध्ये चाहत्यांना प्रवेश देण्यात आला नाही. सध्या ऑस्ट्रेलियामध्ये ए लीगचे सामने सुरू आहेत. शनिवारी प्रेक्षकाविना स्टेडियममध्ये वेस्टर्न सिडनी वंडरर्स आणि सिडनी एफसी यांच्यात सामना खेळवला गेला. ऑस्ट्रेलियामध्ये काेराेनाे व्हायरसचे एक हजारपेक्षा अधिक पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तरीही ऑस्ट्रेलियन रुल्स फुटबाॅल (एएफएल) आयाेजन कायम आहे. या स्पर्धेला १९ मार्चपासून सुरुवात झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button