breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ
#CoronaVirus: नागपुरात सहा जणांना करोनाचा संसर्ग
नागपूरच्या सतरंजीपुरा येथील करोना बाधित व्यक्तीचा दोन दिवसापूर्वी मेयो रुग्णालयात मृत्यू झाला होता. यानंतर त्या कुटुंबातील सर्वांना सक्तीने रुग्णालयात भरती करण्यात आले होते. दरम्यान मेयो रुग्णालयातील पीसीआर यंत्र बंद पडल्यामुळे कुटुंबीयांची करोना चाचणी उशिरा झाली. गुरुवारी मध्यरात्रीनंतर आलेल्या अहवालानुसार कुटुंबातील सहा जणांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. वाढलेल्या रुग्णामुळे शहरातील बाधितांचा आकडा २५ वर पोहोचला आहे. तर अकोला जिल्ह्यात आणखी ४ जणांना करोनाची लागण झाल्याने विदर्भातील आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.