breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: धास्ती! नाशिकमध्ये करोनाच्या भितीने जाळल्या नोटा

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव राज्यात वाढतच चालला आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीच वातावरण आहे. त्यातच सोशल मीडियावर फिरणाऱ्या फेक मेसेजचमुळेही लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये एक व्यक्ती नाका-तोडांला नोटा चुरगाळत होता. याच संशयाने नाशिक जिल्ह्यातील एका गावातील लोकांनाही नोटा जाळल्याचा प्रकार घडला आहे.

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सौदाणे शिवारात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. करोनाच्या धास्तीने ग्रामस्थांनी जळगाव-चोंढी रस्त्याच्या कडेला बेवारस नोटा जाळल्याचे निदर्शनास आलेय. मिळालेल्या माहितीनुसार या नोटांमध्ये २०, १००, २०० रुपयांच्या एकूण दोन हजार रूपयांचा समावेश आहे. ही घटना चार ते पाच दिवसापूर्वीची आहे.

चलनी नोटा रस्त्याच्या बाजूला शेतात दिसल्याने ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. कोणताही धोका नको म्हणून ग्रामस्थांनी या नोटा जाळल्या. अर्धा किलोमीटर परिसरात या नोटा विखुरलेल्या होत्या. यासंदर्भात स्थानिकांशी चर्चा केली असता दहा हजार रुपयांपर्यंत ही रक्कम असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच यामध्ये दोन हजारांच्या नव्या नोटांचा समावेश असल्याचंही त्यांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्रात मालेगांवमध्ये सर्वाधिक करोनाबाधित रूग्ण आहेत. रविवारपर्यंत फक्त मालेगावमध्ये २७ करोनाचे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये चिंतेचे आणि भीतीचं वातावरण आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button