breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus: धक्कादायक! नाशिकमध्ये होम क्वारंटाईनचा शिक्का, असलेल्या फेरीवाल्याकडून रस्त्यावर सर्रास फळविक्री

नाशिक: नाशिकमध्ये होम क्वारंटाईनचा शिक्का असतानाही काही परप्रांतीय फळ विक्रेते रस्त्यावर फळ विकत होते. ही धक्कादायक घटना नाशिकमधील सातपूर येथे घडली आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडालेली आहे. नाशिककरांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे दिसत आहे.

हे फळ विक्रेत झारखंडहून आलेले आहेत. या फळ विक्रेत्यांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता फळ विक्रेत्याच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का असूनही येथे सर्रास फळ विक्री सुरु आहे. पोलीस आणि प्रशासनाकडून नाशिक वाऱ्यावर आहे का, असा प्रश्न आता स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. नाशिकमध्ये सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नाशिकमध्ये कोरोना रुग्णाची संख्या आता 2000 च्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

कोरोनाचा वाढत आकडा हा नाशिककरांसाठी धोकादायक आहे. जिल्ह्यातील रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत होते. पण आता मालेगावनंतर नाशिक शहरातही रुग्ण संख्या वाढू लागल्याने प्रशासन हादरलं आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत 1 लाख 4 हजार 568 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 49 हजार 346 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 3 हजार 830 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button