breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19,09,951 वर

मुंबई – गुरुवारी दिवसभरात आढळलेल्या 3,580 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 19,09,951 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 3,171 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 89 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 18,04,871 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 49,058 वर पोहोचला आहे. तर सध्या 54,891 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

वाचा :-देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,01,46,846 वर

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत गुरुवारी कोरोनाचे 643 नवे रुग्ण आढळले, तर 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,89,204 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 11,045 इतका झाला आहे. तसेच काल 711 जणांनी कोरोनावर मात केल्याने मुंबईत आतापर्यंत 2,69,294 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 8,011 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

वाचा :-पुण्यात ४ जानेवारीपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरु होणार

तसेच सुरुवातीला 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 605 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 9 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3,59,090 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 8,744 इतका झाला आहे. तसेच काल दिवसभरात 1,410 जण कोरोनामुक्त झाल्याने पुण्यात आतापर्यंत 3,42,708 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दरम्यान, काल आढळलेल्या 605 नव्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील 278, पिंपरी-चिंचवडमधील 148, ग्रामीण भागातील 144 आणि कंटेनमेंट झोनमधील 35 रुग्णांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button