breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: धक्कादायक! गुजरातमध्ये सर्वसामान्यांकडून ‘हॉयड्रॉक्सीक्लोरोक्विन’चा वापर

करोना विषाणूवर हायड्रॉक्सीक्लोरोक्विन  गोळ्या हे रामबाण औषध असल्याचे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितल्यानंतर  आता गुजरातमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी या गोळ्या विकत घेऊन वापरण्यास सुरूवात केली आहे.

भारत हा हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्यांचा मोठा उत्पादक असून खरे तर हे मलेरियावरचे औषध आहे. या औषधाची बरीच चर्चा झाल्याने त्याचा खप वाढला आहे.

गुजरात अन्न व औषध प्राधिकरणाचे आयुक्त एच.जी कोशिया यांनी सांगितले, की लोक औषधाच्या दुकानात जाऊन हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या विकत घेत असल्याचे दिसून आले आहे. काही लोक तर या औषधाचा साठा करून ठेवत आहेत. हे ‘एच’ वर्गातील औषध असून ते नोंदणीकृत डॉक्टरच्या चिठ्ठीनुसारच औषध दुकानदारांनी द्यायचे आहे, असे त्यांना सांगितले.

‘..तर शरीरावर दुष्परिणाम’

लोकांनी मनानेच या गोळ्या विकत घेऊन त्या सेवन करणे चुकीचे आहे. हे औषध कुणाच्या सल्लय़ाशिवाय घेतल्याने त्याचे अनेक  दुष्परिणाम होऊ शकतात. या औषधाच्या खरेदी विक्रीच्या नोंदी ठेवण्यास औषध दुकानदारांना सांगण्यात आले आहे. जर या औषधाची साठेबाजी सुरू केली तर बाजारात त्याची टंचाई निर्माण होऊ शकते. गुजरात सरकारने या प्रकारच्या एक कोटी गोळ्यांचा साठा करून ठेवला आहे. गुजरातच्या अन्न व औषध प्राधिकरणाने २८ कंपन्यांना या गोळ्यांचे उत्पादन  करण्याचा परवाना दिला आहे, असे कोशिया यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button