breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: देशातील मृतांचा आकडा दोन हजारांच्या पुढे
देशभरात करोनाचे २०,१९७ रुग्ण बरे झाले आहेत. त्यातील १,५५९ गेल्या २४ तासांत करोनामुक्त झाले आहेत. करोनामुळे गेल्या २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा एकूण आकडा २,२०६ वर पोहोचला आहे. करोनाचे रुग्ण वाढत असले तरी समूह संसर्ग झालेला नाही. करोनाचे अनेक रुग्ण आढळलेली ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्या विभागांमध्ये घराघरांत जाऊन चाचणी घेणे व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजने गरजेचे असल्याचे केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी सांगितले.