breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

लालपरी झाली महाग, मध्यरात्रीपासून एसटीची 18 टक्के दरवाढ

मुंबई – एसटी बसच्या दरात आज मध्यरात्रीपासून 18 टक्के वाढ झाली आहे. इंधनाचे वाढलेले दर, वेतन करार आदी कारणांमुळे ही दरवाढ करण्यात आली असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले आहे.

एसटीच्या नवीन दरवाढीनंतर तिकीटाचे दर पाच रुपयांच्यापटीत करण्यात आले आहे. सात रुपयांचे तिकीट दर पाच रुपये असतील. तर, आठ रुपयांचे तिकीटाचे दर दहा रुपये असणार आहेत. या निर्णयामुळे प्रवासी व वाहक यांच्यात सुट्ट्या पैशांच्या कारणांवरुन होणार वाद थांबले, अशी महामंडळाची अपेक्षा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button