breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Coronavirus: देशभरात चोवीस तासांत 6 हजार 767 नवे रुग्ण, 147 मृत्यू

देशभरात मागील चोवीस तासांत 6 हजार 767 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असुन, 147 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 31 हजार 868 वर पोहचली आहे.

देशभरातील तब्बल 1 लाख 31 हजार 868 करोनाबाधितांमध्ये सध्या उपचार सुरू असलेल्या 73 हजार 560 जण, उपाचारानंतर रुग्णालायतून सुट्टी देण्यात आलेले 54 हजार 440 व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या 3 हजार 867 जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यता आलेली आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये दिवसागणिक करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. शनिवारी दिवसभरात मुंबईमध्ये एक हजार 566 नव्या रूग्णांची भर पडली. त्यामुळे मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या 28 हजार 634 झाली आहे. देशात सर्वाधिक करोनाग्रस्त मुंबई शहरात आहे. मागील 24 तासांत मुंबईमध्ये 40 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील करोनाग्रस्तांच्या बळींची संख्या 949 वर गेली आहे. मागील 24 तासांत राज्यात 60 जणांचा मृत्यू झाला आहे त्यापैकी एकट्या मुंबईतील 40 जण आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button