breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: दादरमध्ये असलेल्या शुश्रुषा रुग्णालयाच्या 2 नर्सेसना करोनाची बाधा,रुग्णालय होणार सील

मुंबईतल्या दादरमध्ये असलेल्या शुश्रुषा रुग्णालयातल्या दोन नर्सेसना करोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे… त्यामुळे हे रुग्णालय सील करण्याची तयारी सुरु झाली आहे. रुग्णालयातील इतर सर्व परिचारिकांना हॉस्पिटलमध्येच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. एकाही नव्या रुग्णाला दाखल करुन घेऊ नका आणि जे रुग्णालयात दाखल आहेत त्यांना पुढील ४८ तासात डिस्चार्ज द्या असे आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत.

मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या ७७५ च्या वर गेली आहे. मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या ही राज्यातल्या संख्येच्या तुलनेत निम्म्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे मुंबईत लॉकडाउनचे नियम आणखी कठोर होणार आहेत असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारीच स्पष्ट केलं.

दरम्यान आज मुंबईतल्या दादर या ठिकाणी असलेल्या शुश्रुषा रुग्णालयातल्या दोन नर्सेसना करोनाची लागण झाली आहे. यामुळे रुग्णालयातल्या इतर नर्सेसना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तर रुग्णालय सील करण्याची तयारीही सुरु करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button