breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची इमारत बनलीय दारूड्यांचा, प्रेमी युगुलांचा अड्डा!

मुंबई | महाईन्यूज |

गोवा हायवेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या नावानं उभारण्यात आलेली इमारत आहे…या इमारतीला झाडाझुडपांनी वेढा घातला होता …एवढच नाही तर ही इमारत दारूडे आणि प्रेमी युगुलांचा अड्डा बनली आहे. संगमेश्वरातील हे धक्कादायक वास्तव असून त्याकडे आता स्मारक समिती आणि शासनाचं देखील दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे या स्मारकाचा उपयोग आता भगतगिरी, दारूडे आणि प्नेमी युगुल करताना दिसत आहे. या ठिकाणी दारूच्या बाटल्या, कंडोम आणि भगतगिरीकरता वापरण्यात येणारी बाहुली देखील सापडली आहे.

छत्रपती सभाजी महाराजांना दगाबाजीनं ज्या ठिकाणी पकडलं त्या कसबापासून काही अंतरावर आणि मुंबई – गोवा महामार्गाला लागूनच हे स्मारक आहे…काही शंभुप्रेमींनी एकत्र येत ही झाडं साफ केली. 11 मार्च 1986 रोजी तत्कालीन मुंख्यमंत्री शरद पवार, गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतिपसिंह राणे आणि महाराजांच्या काही वंशजांच्या उपस्थितीत जाखमाता मंदिराजवळ हा भूमिपुजन सोहळा संपन्न झाला. त्यानंतर जवळपास 15 ते 20 वर्षानंतर ही इमारत उभी राहिली. आतापर्यंत जवळपास 65 लाख रूपये खर्च या इमारतीवर करण्यात आला आहे. पण, सध्या मात्र या इमारतीची दुरावस्था झाली आहे. शिवाय, पावसाळ्यात देखील या इमारतीच्या छताला गळती लागलेली दिसून येते. त्यामुळे इतका निधी खर्च होऊन देखील छत्रपती संभाजी राजेंचं स्मारक निधी खर्च करण्याचं माध्यम ठरतंय का? असा सवाल देखील विचारला जात आहे.

या साऱ्याबाबत स्मारक समितीच्या सदस्यांसोबत संवाद देखील साधण्यात आला. पण, या स्मारक समितीवर नेमकं कोण आहे? त्यांची ठोस अशी माहिती मात्र संबंधित सदस्याकडून देण्यात आलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button